जलवाहिनीतून पाणी आले, तर मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागरी सत्कार करणार - अंबादास दानवे

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

जलवाहिनीतून पाणी आले, तर मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागरी सत्कार करणार - अंबादास दानवे



 जलवाहिनीतून पाणी आले, तर मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागरी सत्कार करणार - अंबादास दानवे

ON फडणवीस पाणीप्रश्न

- सरकारच्या दुर्लक्षामुळे संभाजीनगर पाणी प्रश्न निर्माण झाले आहेत. फडणवीस यांनी ऑक्टोबर ची तारीख दिली आहे. जर या जलवाहिनीतून पाणी आले, तर 1 नोव्हेंबरला मी स्वतः फडणविसांचे नागरी सत्कार करणार. आणि पाणी दिले नाही, तर पुन्हा आंदोलन करू.

ON शिरसाठ हॉटेल खरेदी

- मराठी माणसाने व्यवसाय करावे, लुटमार करू नये.

ON दरोड्यातील सोन, एन्काऊंटर

- पालकमंत्री संजय शिरसाठ काही तपास अधिकारी नाही. पोलिसांवर विश्वास ठेवला पाहिजे.

- दरोड्यातील पाच आरोपी पकडले, एकाच एन्काऊंटर केला मात्र सोन आहे कुठे? 

- दरोड्यातील सोन्याच्या वाट्यावरून एन्काऊंटर झालं, असे लोक म्हणतात, आणि सोने कुठे आहे असा प्रश्न जनतेच्या मनात आहे.

ON प्रफुल पटेल विरोध

- त्या बद्दल मला माहिती नाही, ते दोन्ही पक्ष समर्थ आहेत. दोन्ही पक्षाचा तो अंतर्गत विषय आहे.

ON जालिंदर सुपेकर.

- त्यांच्या वेगवेगळ्या विभागातील चार्ज काढण्यात आलेले आहे. त्यांना सेवेतून निलंबित करून, घरी बसवायला पाहिजे.

ON लाडकी बहीण

सरकारने त्यावेळी सरसकट पैसे देण्यात आले आहे. लाडक्या बहिणींना धक्का न लावता ज्यांनी सरकारी नोकरीवर असलेल्यांची फॉर्म मंजूर केले आहे. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.

ON कर्ज बुडवे

- राजकारण्यांची जी इमेज केलेली आहे, ती चुकीची आहे. उद्योगपती किती बुडवितात ते पाहा. जे कर्ज बुडवितात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

- 50 हजार हेक्टरच्यावर  शेतीमध्ये अवकाळी आणि अतिवृष्टी ची सरकार दाखल घ्यायला तयार नाही. सरकारने पंचनामे केले पाहिजे. यापूर्वीचे भरपाई सरकारने दिली नाही. आता तरी शेतकऱ्यांच्या पदरात सरकारने काही तरी द्यावे.

ON लाडकी बहीण

- सरकार एकच योजनेसाठी काम करीत असल्याचे दिसते. सरकार लूटमारी करते. सरकारकडे पैसे आहेत. ठाणे मुंबई मध्ये 3 हजार कोटी पेक्षा अधिकच टेंडर दिले आहेत.

ON धनंजय मुंडे विपश्यना

- धनंजय मुंडे यांचा वयक्तिक विषय आहे. ते विपश्यनेणा गेले असतील, तर चांगले आहे. पुन्हा फ्रेश मूडमधे ते काम करतील.

ON पाणीप्रश्न, वॉटरग्रीड वर फडणवीस वक्तव्य

- मराठवाडा वॉटर ग्रीडची घोषणा करून, दोन वर्षे झाले. अजून सर्वेक्षण सुरू नाही आहे. किती खोटे बोलणार. देवेंद्र फडणवीस हे श्रीकृष्ण आहेत का? पाऊस पडायला गोवर्धन पर्वत हलवायला. गोदावरी खोरे बाबत खोटे बोलणार, उजनी खोरे बाबत खोटे बोलणार.

ON संजय राऊत पुस्तक

- सगळे पुस्तक मला आवडतात असे नाही. आवडलेलेच पुस्तक वाचले पाहिजे असे नाही. राऊत साहेबांचा पुस्तक कुणाला आवडत नसेल, मात्र वाचले पाहिजे.

- शासनाच्या विरोधात आवाज उचलला, म्हणून राऊत यांना तुरुंगात जावे लागले.

- धुळ्यात कोट्यवधी रुपये आढळले, अर्जुन खोतकर यांच्यावर आरोप आहे. संजय शिरसाठ ६७ कोटीत हॉटेल घेतात, कुठून येतात ६७ कोटी. यामुळे नरकातला स्वर्ग हे पुस्तक महत्वाचे ठरते.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.