कर्मचारी कार्यालयात वेळेवर हजर होण्यासाठी बुलढाणा तहसीलदारांनी लढवली अनोखी शक्कल

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

कर्मचारी कार्यालयात वेळेवर हजर होण्यासाठी बुलढाणा तहसीलदारांनी लढवली अनोखी शक्कल

LOKSANDESH  NEWS 



 कर्मचारी कार्यालयात वेळेवर हजर होण्यासाठी बुलढाणा तहसीलदारांनी लढवली अनोखी शक्कल

 शासकीय कार्यालयामध्ये कर्मचारी उशिरा येतात किंवा हजर राहत नसल्याची बऱ्याचदा ओरड केली जाते. मात्र कार्यालयात कर्मचारी वेळेत हजर व्हावे यासाठी बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी एक नवीन संकल्पना राबवायला सुरुवात केली आहे. शासकीय कार्यालयाची वेळी सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत असून बुलढाणा तहसील कार्यालयातील तहसीलदारांसह सर्व कार्यरत कर्मचारी ठीक पावणेदहा वाजता हजर होतात. आणि दहा वाजता तहसीलदारांच्या दालनामध्ये महाराष्ट्र गीताने दिवसाच्या कामकाजाची सुरुवात केली जाते. 

ज्यामुळे कर्मचाऱ्यांना एक वेगळी ऊर्जा प्राप्त होते. या अनोख्या उपक्रमामुळे सर्वे कर्मचारी वेळेवर कार्यालयात हजर होत असल्याने तालुक्यातून आलेल्या नागरिकांची कामे गतीने होत आहेत. राज्यातील तहसील कार्यालयातील हे पहिलीच संकल्पना असून इतर कार्यालयांमध्ये देखील अशा पद्धतीने उपक्रम राबवल्यास शासकीय कामकाज गतिमान होऊन लेट लतीफ कर्मचाऱ्यांना नक्कीच आळा बसणार आहे.



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./