इगतपुरीतील पर्यटन नागरिकांसाठी मनमोहक करण्याचा वनविभागाचा निर्णय

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

इगतपुरीतील पर्यटन नागरिकांसाठी मनमोहक करण्याचा वनविभागाचा निर्णय

 

LOKSANDESH  NEWS 


                   इगतपुरीतील पर्यटन नागरिकांसाठी मनमोहक करण्याचा वनविभागाचा निर्णय


 मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा घाटाच्या माथ्यावर वाटसरूंची तहान भागविणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेली टोप बारव आहे. मात्र ही बारव दुर्लक्षित होती आता महाराष्ट्र शासन, पुरातत्व विभाग आणि वन विभाग मिळून या ऐतिहासिक ठेवींचे जतन व सुशोभीकरण करण्यता येणार आहे.  यात अंदाजे 70 ते 80 लाख रुपये खर्च करून प्रवेशद्वार, पुरातन दिसतील असे संरक्षक भिती, बगीचा, बसण्यासाठी आसन व्यवस्था, पार्किंग, नाल्याच्या प्रवाह रोखून धबधबे निर्माण करणार, दगडी फरशा, रेलिंग करून समतल जागेवरून मनमोहक निसर्गाचा आनंद घेता येणार आहे.

 शिवाय जिवंत झरा जिथंपर्यंत येतो तिथे लहान बावडी बनवणार असून ऐतिहासिक टोप बारवचे पुरातत्व विभागाच्या वतीने व्यवस्थित डागडुजी करून त्याचे पुनर्जीवन होणार आहे. यामुळे पर्यटकांच पर्यटन अजून सुंदर होणार असून स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगारही उपलब्ध होणार असल्याची माहिती वनविभागाचे वनरक्षक आर व्हि जंगम यांनी दिली.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.