भारत पाकिस्तान युद्धामध्ये गरज भासल्यास वैद्यकीय क्षेत्र तत्पर - डॉक्टर मंगेश मेंढे

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

भारत पाकिस्तान युद्धामध्ये गरज भासल्यास वैद्यकीय क्षेत्र तत्पर - डॉक्टर मंगेश मेंढे


            भारत पाकिस्तान युद्धामध्ये गरज भासल्यास वैद्यकीय क्षेत्र तत्पर - डॉक्टर मंगेश मेंढे 



  पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पाकिस्तानला भारत देशाकडून सुद्धा योग्य ते प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली आहे. अशातच कोणत्याही वैद्यकीय सेवा सैन्याला भासली तर आम्ही तत्पर राहू असं वक्तव्य विशेष कार्यकारी अधिकारी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अमरावती येथील डॉ.मंगेश मेंढे यांनी केले आहे. 

या संदर्भात त्यांनी सरकारकडे पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे. परिवारातील अनेक जण सैन्य दलामध्ये कार्यरत होते किंवा असल्यामुळे माझी सुद्धा इच्छा राहील की मी देशाप्रती काहीतरी करून दाखवेल त्यामुळे मी सरकारकडे पत्रव्यवहार केला आहेत की आम्हाला सुद्धा सैन्यांना सेवा देण्याची सौभाग्य लाभावे असे डॉक्टरांनी म्हटले आहे.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली