- बुलढाणा जिल्हातून जात असलेल्या समृद्धी महामार्गावर दुसरबीड जवळ नागपूर कॉरिडॉर वर चालता ट्रक ने अचानक पेट घेतला. या घटनेत ट्रॅक संपूर्ण जळून खाक झाला असून ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत ट्रॅक बाजूला उभा करून आपला जीव वाचविला. त्यामुळे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा ट्रक सातारा वरून रांची येथे कलर चे डब्बे घेऊन जात होता.
मात्र चालकाचे केबिन ला शॉर्टसर्किट ने आग लागली आणि पाहता पाहता संपूर्ण ट्रॅक जळाला. यावेळी समृद्धी महामार्ग प्रशासनाने तत्काळ अग्निशमन दलाला बोलावून ट्रक ची आग विझविली. यात ट्रकचे मोठे नुकसान झाले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.