चोपडा पंचायत समितीच्या अल्पभवन परिसरात अज्ञात इसम मृत अवस्थेत सापडला
चोपडा शहरातील पंचायत समितीच्या अल्पभवन इमारतीच्या परिसरात 45 ते 50 वयोगटातील अनोळखी इसमाच्या डोक्यावर व शरीरावर जखमा झालेला अनोळखी इसम आढळून आला. या हे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप, चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे व अधिकारी कर्मचारी दाखल झाले. तसेच मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन च्या माध्यमातून पंचनामा करण्यात आला.
या इसमाचा पोस्टमार्टम झाल्यानंतरच पुढील तपासाला गती मिळेल संदर्भात जिल्ह्या वरून विविध पथक मागविण्यात येत आहे. प्रथमदर्शनी अनोळखी इसम त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचा उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./