दक्षिण सोलापुरातील तांदुळवाडीच ग्रामदैवत श्री. नागनाथ महाराज यात्रेस भाविकांची मोठी गर्दी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

दक्षिण सोलापुरातील तांदुळवाडीच ग्रामदैवत श्री. नागनाथ महाराज यात्रेस भाविकांची मोठी गर्दी

 



दक्षिण सोलापुरातील तांदुळवाडीच ग्रामदैवत श्री. नागनाथ महाराज यात्रेस भाविकांची मोठी गर्दी

 


 दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदुळवाडीचे ग्रामदैवत श्री. नागनाथ महाराजांच्या यात्रेस आजपासून सुरुवात झाली. आज पहाटे पासून श्री. नागनाथ महाराज देवस्थानात भाविकांची मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं. आज ग्रामदैवत श्री. नागनाथ महाराज आणि ग्रामदैवत श्री महालिंगराया या दोन देवाच्या पालखीचा संपूर्ण गावातून मोठ्या भक्तिभावाने मिरवणूक काढण्यात आली.

 या दोन देवांच्या पालखी समवेत तीन काट्याची ही मिरवणूक काढण्यात आली. या यात्रेस आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दोन्ही देवांच्या पालख्या आणि तीन काठ्यांची मिरवणूक संपन्न झाल्यानंतर दोन्ही देवांची पालख्या आणि तीनीही काठ्या नागनाथ महाराज मंदिरात आल्यानंतर धार्मिक कार्यक्रमांचे करण्यात येईल.


 लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली