सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरील पुढील सुनावणी 17 जून रोजी होणार
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी पक्षाचे वकील उज्वल निकम यांच्या उपस्थितीत आजचा युक्तिवाद झाला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप निश्चिती बाबत पुरेसे पुरावे असून, आरोप निश्चिती करून घ्यावी. असा अर्ज उज्वल निकम यांनी न्यायालयाला सादर केला. तर वाल्मीक कराडच्या वकीला कडून अद्याप सरकारी पक्षाकडून डिजिटल एव्हिडन्स मिळाले नसल्याचं म्हणणे मांडण्यात आलं. तर वाल्मीक कराडच्या दोष मुक्तीच्या अर्ज न्यायालयात प्रस्तावित केला आहे. या दोन्ही बाबींवर 17 जून रोजी सुनावणी होणार आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.