धुळ्यात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेश बदलत बनावट बियाणे केले जप्त; जवळपास 20 लाखांचे बनावट बियाणे जप्त
धुळे कृषी विभागाच्या वतीने आज गुजरात हून येणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्समधून लाखो रुपयांचे कपाशीचे बनावट बियाणं जप्त करण्यात आले. वेशभूषा बदलत कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी रात्रभर गस्त घालत होते. मिळालेल्या माहितीनुसार वाहनांवर छापा टाकून जवळपास 20 लाख रुपयांचे बनावट बियाणं व महाराष्ट्रात प्रतिबंध असलेले बियाणं जप्त करण्यात आले.
जवळपास या कारवाईमध्ये बाराशे ते तेराशे बनावट कपाशीचे बियाणे जप्त करण्यात आले. ही सर्व बियाणे गुजरातमधून महाराष्ट्रात विक्रीसाठी आली होती. अंकुर कंपनीच्या नावाने बनावट बियाणे तयार करण्यात आली होती तर पीनगार्ड, राशी 659 5g अशी बनावट पाकीट तयार करून बनावट बियाणे महाराष्ट्रात दाखल होत असतानाही मोठी कारवाई कृषी विभागाने केली आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.