सरकार मुसलमानांना गुडघ्यावर आणू इच्छित आहे - जितेंद्र आव्हाड
वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड देशभर जनजागृती करत असून, त्याचाच भाग म्हणून भिवंडीत शांतीनगर येथे 'तहफ्फूज-ए-अवकाफ कॉन्फरन्स' सभेचे आयोजन भिवंडी शाखेच्या वतीने करण्यात आले. या सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रमुख मौलाना महमूद अहमद खान होते. वक्फ मालमत्तांवर सरकारी हस्तक्षेप वाढवणाऱ्या विधेयकाचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला.
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. सय्यद कासिम रसूल इलियास यांनी प्रमुख मार्गदर्शन केले, तर खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा, कळवा-मुंब्रा आमदार जितेंद्र आव्हाड, मालेगावचे आमदार मुफ्ती इस्माईल कासमी, भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख, मुंबईचे आमदार अमीन पटेल, मौलाना जहीर अब्बास रिजवी आणि मौलाना अब्दुल जब्बार महीरुल कादरी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. वक्त्यांनी वक्फ मालमत्तांचे संरक्षण करण्यासाठी समाजाने एकत्र येण्याचे आवाहन करत विधेयकाला विरोध करण्याचा निर्धार व्यक्त केला
वक्फ विधेयकाविरोधात आम्ही एक झालो आहोत. गर्दी कमी असल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत ही लढाई जनतेची आहे. कब्रस्तान व मशिदी साठी जमीन कोठून आणणार, सरकार मुस्लिमांना गुडघ्यावर आणू इच्छिते. जा सरकारी यंत्रणेकडे यांच्यासारखे कब्रस्तान जमिनी साठी. वक्फ म्हणजे दान आहे. एकदा केलेले दान परत घेता येत नाही. महाभारत मध्ये कर्ण ला मिळालेले कुंडल दान राज्याने घेतल्याने त्याचा मृत्यू झाला. कायदा बनवताना वक्फ ची जमीन विकणाऱ्या ला तुरुंगात टाका, आता कायद्याने सरकार विकणार याला आमचा विरोध आहे. सरकार वक्फ बोर्डाच्या जमिनी विकणार आहे. आरएसएस च्या मुखपत्रता ख्रिश्चन समाजाकडे अधिक जमीन असल्याचे लिहिले होते. जागतिक स्तरावर दबाव आल्याने तो अंक मागे घेतला गेला. 500, 600 वर्षांपूर्वीच्या मशिदींच्या जमिनीचे कागद कोणाकडे मागणार. निशिकांत दुबे यांनी मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना यांच्या विधानावर टिपणी करीत ते सामाजिक वाद घडवू इच्छितात असे वक्तव्य केले. हा विधेयक मुस्लिम विरोधात, संविधान विरोधात आहे.
शरीयत कायद्याने वक्फला मान्यता आहे. त्यामध्ये कोणाचीही दखल आम्ही सहन करणार नाही. सर्वोच्च न्यायालावर आमचा विश्वास आहे. आम्हाला न्याय नक्कीच मिळेल. बाबरी मशीद प्रकरणी न्यायालयाने निकाल दिल्यानंतर ही ती बाबरी मशीद होती, आहे आणि राहील. आज तेथे काहीही असले तरी ती बाबरी मशीदच राहील.