LOKSANDESH
NEWS
महावितरणच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त बुलढाण्यात जनजागृती रॅली
`
महावितरणच्या 20 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘शून्य अपघात महावितरण, शून्य अपघात महाराष्ट्र’ ही संकल्पना घेऊन 1 ते 6 जून 2025 या कालावधीत महावितरण कडून विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. आज महावितरण कंपनीचा 20 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या निमित्ताने आज बुलढाणा शहरात महावितरण कडून जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती.
तसेच ग्राहकांना सुरक्षाविषयक ई-मेल व एसएमएस पाठवणे, भित्तिपत्रके, चित्रफिती अशा विविध माध्यमांद्वारे विद्युत सुरक्षेविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. मागील काही वर्षांमध्ये वीज अपघाताचे प्रमाण कमी करण्यात महावितरणला यश आले आहे. मात्र तरीही विविध कारणास्तव अपघात होतात. विद्युत अपघाताचे प्रमाण अजून कमी करण्यासाठी महावितरणने हा विद्युत सुरक्षा सप्ताह आयोजित केला आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.