राजापूर कोंडये येथे मध्यरात्री कंटेनरला लागली आग
मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर कोंडये येथे एका कंटेनरला मध्यरात्री अचानक आग लागली. मॅगीने भरलेला हा ट्रक गोव्याहून मुंबईच्या दिशेने चालला होता. मध्यरात्री अडीच वाजता या कंटेनरला कोंडये येथे अचानक आग लागली.
दरम्यान, आगीची घटना समजताच राजापूर नगर परिषदेचा अग्निशामक बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कंटेनरचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे, मात्र 70 टक्के माल वाचविण्यात यश आलं.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.