धुळ्यात किटकजन्य आजाराविषयी जनजागृती मोहीम
जिल्हा हिवताप कार्यालय आणि धुळे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने कीटकजन्य कार्यक्रमांतर्गत कीटकजन्य आजारांविषयी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. जून हा हिवताप प्रतिरोध महिन्यानिमित्त चिकनगुन्या, डेंग्यू व इतर कीटकजन्य आजारांविषयी जागृतीचे काम केले जात आहे. आज धुळे शहरातील नेहरूनगर परिसरामध्ये धुळे महानगरपालिका व जिल्हा हिवताप कार्यालय मार्फत कीटकजन्य आजारांविषयीचे जनजागृतीचे पत्रके वाटप करत जागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आरोग्य सेवकांनी सांगितले की, जून हा महिना अत्यंत महत्त्वाचा असून या महिन्यात सर्वच नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच आपल्या रक्ताचे नमुने तपासणी करून योग्य उपचार करावे. आपल्या आजूबाजूच्या परिसरात असलेल्या सांडपाण्याचे डबके यांची तात्काळ विल्हेवाट लावावी, जेणेकरून डासांची उत्पत्ती होणार नाही. याकडे सर्व नागरिकांनी लक्ष द्यावे, अशा विविध सूचना यावेळी करण्यात आल्या.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.