LOKSANDESHNEWS
ठाण्यात पर्यावरण दिनाच्या दिवशी पर्यावरण प्रेमींचे आंदोलन
पर्यावरण दिनानिमित्त ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट परिसरात असणारे कावेसर तलावाचे सुशोभीकरण म्हणजे एक प्रकारचे निसर्गाची हानी आणि घाट घातला जात असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी आणि काही संस्थेने केलेला आहे. काही दिवसांपूर्वी याच कावेसर तलावाचे सुशोभीकरणासाठी महानगरपालिका आणि खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते.
मात्र, कुठेतरी तलाव वाचवा आणि निसर्ग वाचवा यासाठी महापालिकेचा निषेध म्हणून काळे कपडे परिधान करत स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. आजूबाजूला काँक्रिटीकरण होणार त्यामुळे निसर्गाची हानी होणार असल्याचे देखील आंदोलकांनी सांगितले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आता या कावेसर तलावा संदर्भात महानगरपालिका आणि स्थानिकांचा आमना सामना पाहायला मिळणार आहे
.लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.