गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर आढळला मृत डॉल्फिन
- गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर आज दुपारी एक मृत डॉल्फिन पडलेला आढळला. किनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी आलेल्या स्थानिक नागरिकांना आणि पर्यटकांना वाळूमध्ये हा मृत डॉल्फिन पडलेला दिसला. त्यानंतर अनेकांनी त्याच्याजवळ धाव घेतली. या डॉल्फिनची लांबी चार फुटापर्यंत आहे. हा डॉल्फिन कोणत्या प्रजातीचा आहे किंवा त्याच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, या घटनेने पुन्हा एकदा सागरी पर्यावरणाच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.