बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर चोपडा तहसील कार्यालयात बैठक संपन्न
चोपडा तहसील कार्यालयात तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या दालनात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली. या बैठकीत पशु वैद्यकीय अधिकारी नगरपालिकेचे अधिकारी, चोपडा शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी, कुरेशी समाजाचे नागरिक, तसेच मुस्लिम समाजाचे नागरिक उपस्थित होते. या बैठकीत ७, ८, ९ या दिवशी चोपडा तालुक्यात बकरी ईद साजरी करण्यात येते. त्यानिमित्त कुर्बानीच्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य होऊ नये, यासाठी नगरपालिकेने काळजी घ्यावयाची, तसेच पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यांची जबाबदारी यासंदर्भात चर्चा करण्यात आली. शासनाच्या नियमानुसार पशुला टॅग असणे बंधनकारक आहे. बकरी ईद शांततेत साजरी व्हावी, यासाठी चर्चा करण्यात आली.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.