चंदनझीरा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

चंदनझीरा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

LOKSANDESH  NEWS




  चंदनझीरा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग म्हणून मानला जातो. संपूर्ण महाराष्ट्रात हा सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आज दि. 06 शुक्रवार रोजी सकाळी चंदनझीरा येथील सिद्धिविनायक नगर स्थित नियोजित शिवस्मारक स्थळी शिवप्रेमींच्या वतीने शिवराज्यभिषेक सोहळा ऊत्साहात संपन्न झाला. यावेळी शिवप्रेमींच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी शिवप्रेमींच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करून एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.

   याप्रसंगी जगन्नाथ चव्हाण, शांतीलाल राऊत, अक्षय मोरे, संतोष रासवे, राम गाडेकर, राधाकिशन दाभाडे, गणेश तुपे, शिवाजी कऱ्हाळे, भागवत निकम, गजानन ढब्बे, विश्वंभर येवले, बद्री जाधव, रमेश तुपे, चेतन गुजर, भगवान कावळे, हनुमान गायकवाड, हरिभाऊ बुलबुले, जाधव मामा, गजानन ईंगळे, आकाश देठे, गजानन ऊंडे, रवि काकडे ई. सहीत

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कमेटी चंदनझीराचे पदाधिकारी व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली