झेडपी' शाळेत मुलांचा प्रवेश तर मालमता कर माफ' पोफाळी ग्रामपंचायतीने घेतला महत्त्वपूर्ण ठराव
उमरखेड जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढावी, यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जात आहे. जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्यास मालमत्ता, पाणी कर माफ करण्यात येईल, असा ठराव पोफाळी ग्रामपंचायतीने घेतला आहे. या उपक्रमाचे तालुक्यात कौतुक केले जात आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थी पटसंख्या वाढावी, गावातील विद्यार्थी दुसऱ्या शाळेत गावाची शाळा सोडून जाऊ नये, उपस्थिती संख्या सर्वाधिक असली पाहिजे यासाठी पोफाळी वसंतनगर शाळेत नवीन प्रवेश घेतल्यास पालकांचा २०२५-२६ या वर्षाचा घरपट्टी व पाणीपट्टी पूर्ण कर माफ करण्यात येईल, असा ठराव पोफाळी ग्रामपंचायतीने घेतला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थी संख्या वाढविण्याकरिता पुढाकार घेणारी पोफाळी तालुक्यात एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे.