LOKSANDESH NEWS
कोल्हापुरात सात महिन्याच्या गर्भवती महिलेचा हुंड्यासाठी मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना
कोल्हापुरात एका सात महिन्याच्या गर्भवती महिलेचा हुंड्यासाठी मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमविवाह करूनही लग्नानंतर अवघ्या वर्षभरातच 10 लाखांच्या हुंड्यासाठी पतीकडूनच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
करवीर तालुक्यातील वरणगे पाडळीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित पीडित महिलेनं पती रोहीत अर्जुन दुधाणे विरोधात करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असतानाच अशी घटना घडणं, चिंतेची बाब आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली