Loksandesh news
आष्टी तालुक्यात मुसळधार पावसाने मोठे नुकसान; आमदार धस यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी
बीडच्या आष्टी तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाची आमदार सुरेश धस यांनी पाहणी केली. बीड अहिल्यानगर महामार्गावरील मोठमोठी झाडे उन्मळून पडली असून, विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा तुटल्या आहे. परिणामी कालपासून परिसरातील विद्युत पुरवठा खंडित आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा आमदार धस यांनी घेतला. यावेळी महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. दरम्यान, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी तहसील प्रशासनाला माहिती द्यावी असे आवाहन धस यांनी केले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड. मुंबई /सांगली.