भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे नऊ दिवसांपासून आंदोलन
तांत्रिक दर्जा आणि वेतन श्रेणी लागू करावी, यासह विविध मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. त्या तातडीने सोडवाव्यात आणि त्याची अंमलबजावणी करावी, यासाठी भंडाऱ्यात मागील नऊ दिवसांपासून भूमी अभिलेख कर्मचारी संघटना आंदोलन करत आहेत. भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील नऊ दिवसांपासून त्यांचं हे आंदोलन सुरू असून, आंदोलनस्थळी त्यांच्या मागण्यांसाठी घोषणाबाजी करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.