तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात टोकन दर्शन चाचणी सुरू
तिरुपती बालाजीच्या धरतीवर पंढरपुरात विठ्ठलाचे टोकन दर्शन सुरू करण्यासंदर्भातील पूर्व चाचणी सुरू झाली आहे. टोकन दर्शन पद्धती साठी सध्या प्रायोगिक तत्वावर दररोज 3 हजार 600 भाविकांना ऑनलाइन बुकिंग करून कमी वेळेत दर्शनाला सोडण्यात येत आहे. पंढरपूर विठ्ठल मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावरून निशुल्क पद्धतीने टोकन पद्धतीचे ऑनलाईन बुकिंग होते. त्यामुळे भाविकांना आता सहज आणि सुलभ दर्शनाची व्यवस्था पंढरपुरात निर्माण झाली आहे. ऑनलाइन दर्शन पद्धतीमुळे काही काळ सामान्य भाविकांना विलंब होतो आहे. मात्र याबाबतही मंदिर प्रशासनाकडून आता सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.