प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी प्रादेशिक पर्यावरण विभागाच्या वतीने रॅलीचे आयोजन
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी प्रादेशिक पर्यावरण विभागाच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौकातून निघालेली ही रॅली महानगरपालिका मुख्यालयाच्या येथे समाप्त करण्यात आली. यावेळी नागरिकांना प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन करण्यात आले.