मी स्वबळाची तयारी केली आहे, जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल- धर्मराव बाबा आत्राम
- पक्ष जे निर्णय घ्यायचाय तो निर्णय घेईल मात्र आमच्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती वेगळी आहे. विचार करूनच आम्हाला पुढे जावे लागेल
- मागील निवडणुकीत मी संपूर्ण दृश्य बघितलेले आहे, काय या निवडणुकीत माझ्यासोबत झालं. आम्हाला जर आमच्या पक्षाला मजबूत करायचे असेल तर आम्हाला निवडणूक लढावी लागेल
- पक्षाला व उमेदवाराला बळकट करायचे असेल त्या दृष्टीने चांगली उमेदवार देणे गरजेचे आहे. त्याविषयी महायुतीचे नेते मिळवून जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भातील निर्णय घेऊ.
- मी स्वबळाची तयारी केली आहे त्या दृष्टीने येत्या काळात गडचिरोली जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल
- मैत्रीपूर्ण निवडणूक सुद्धा होईल गडचिरोली जिल्ह्यामध्ये व चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आपली सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करेल
- राष्ट्रवादी काँग्रेसची जी बैठक होती त्या बैठकीत मी आपले विचार ठामपणे मांडतो. विदर्भात जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मजबूत करायचा असेल त्यासाठी आमची ताकद दाखवणे आम्हाला गरजेचे आहे.
ऑन पालकमंत्री पद रायगड
- रायगड पालकमंत्री पदावरून आम्ही आपला दावा सोडला नाही आहे. पालकमंत्री सुद्धा आमचा झाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. आमचा पालकमंत्री त्या ठिकाणी होणार
- तीन पक्षाचे सरकार असल्याने थोडेफार कमी जास्त होत असते आणि काही प्रमाणात टीका होत असतात. परंतु निवडणूक आली की सर्व एकत्र येऊन विचार करून पुढे जातील.
ऑन आमदार निधी
- निधी मिळेल आता बजेट आहे त्यामुळे निधी मिळेल. निधी मिळण्यावरून कुठल्या प्रकारची आमच्याकडे तक्रार नाही आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.