पर्यावरण दिनानिमित्त डहाणू शहर मंडळ (नगरपालिका) क्षेत्रात वृक्षारोपण कार्यक्रम
आज दिनांक ५ जून २०२५ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डहाणू शहर मंडळ (नगरपालिका) क्षेत्रामध्ये वृक्षारोपणाचा विशेष उपक्रम राबवण्यात आला.
पर्यावरण संरक्षण आणि हरित क्षेत्र वाढवण्याच्या उद्देशाने आपले लाडके माजी नगराध्यक्ष तसेच भाजप पालघर जिल्हाध्यक्ष श्री.भरतभाई राजपूत यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाद्वारे लोकांमध्ये पर्यावरण जागरूकता वाढवणे, प्रदूषण कमी करणे व हरित वातावरण निर्मिती करणे हा मुख्य उद्देश होता.
सदरच्या कार्यक्रमात डहाणू शहर मंडळ अध्यक्ष श्री.पिनल शहा, माजी नगर सेवक श्री.रमेश काकड, श्री.संदेश पाटील, श्री.श्रीकांत ठक्कर, श्री.प्रफुल्ल पाटील, डहाणू युवा मोर्चा अध्यक्ष श्री.राज पटेल, पालघर जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष श्री. दक्षेस पाटील, पालघर जिल्हा महिला उपाध्यक्षा श्रीमती सुजाता माळी, महिला मोर्चा अध्यक्षा श्रीमती रश्मी पांचाळ व इतर महिला, श्री.फयाज खान, श्री.राकेश सरवैया,श्री.मोईज शेख, श्री. जिग्निल पाटील व इतर कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.